शिरगांव समुद्र किनारा ( काला पत्थर )

शिरगांव समुद्र किनारा ( काला पत्थर )

आज दिनांक ०२/०४/२०१७ रोजी सकाळी मी व दानिश सर आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर निघालो .चांगली ओहोटी लागलेली होती ،त्यामुळे पाणी खूप आतपर्यंत गेले होते व किनाऱ्यावरील खडकांची रांग उघडी झाली होती .सकाळी सकाळी पाड्यावरील बायका व लहान मुले शिंपले वेचण्यासाठी तिकडे निघाले होते ،त्यांच्यासोबत असलेली कुत्री लाटांमधून धावत मासे पकडण्यासाठी आलेल्या पक्ष्यांना पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होती . 



                आम्ही पण निघालो आता भरती येण्यासाठी खूप अवकाश असल्यामुळे पाण्यात अडकण्याचा प्रश्न नव्हता .खडकांमधील चित्रविचित्र  आकृत्या व त्यामधील वेगवेगळे जीव  बघण्यात खूप नवल वाटत होते .



 आज एक वेगळ्या प्रकारची किंचित गुलाबी रंगाची गोगलगाय पाण्यातील खडकांमध्ये दिसले तिला दगडाने स्पर्श केल्यार तिने स्वरक्षणासाठी  गडद गुलाबी रंगाची शाई सोडली तिचा video सोबत देत आहोत ...





Comments

Popular posts from this blog