Popular posts from this blog
शिरगांव समुद्र किनारा ( काला पत्थर )
शिरगांव समुद्र किनारा ( काला पत्थर ) आज दिनांक ०२/०४/२०१७ रोजी सकाळी मी व दानिश सर आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर निघालो .चांगली ओहोटी लागलेली होती ،त्यामुळे पाणी खूप आतपर्यंत गेले होते व किनाऱ्यावरील खडकांची रांग उघडी झाली होती .सकाळी सकाळी पाड्यावरील बायका व लहान मुले शिंपले वेचण्यासाठी तिकडे निघाले होते ،त्यांच्यासोबत असलेली कुत्री लाटांमधून धावत मासे पकडण्यासाठी आलेल्या पक्ष्यांना पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होती . आम्ही पण निघालो आता भरती येण्यासाठी खूप अवकाश असल्यामुळे पाण्यात अडकण्याचा प्रश्न नव्हता .खडकांमधील चित्रविचित्र आकृत्या व त्यामधील वेगवेगळे जीव बघण्यात खूप नवल वाटत होते . आज एक वेगळ्या प्रकारची किंचित गुलाबी रंगाची गोगलगाय पाण्यातील खडकांमध्ये दिसले तिला दगडाने स्पर्श केल्यार तिने स्वरक्षणासाठी गडद गुलाबी रंगाची शाई सोडली तिचा video सोबत देत आहोत ...





Comments
Post a Comment